लऊळ परडी रोडवर सापडलेला मोबाईल परत करून दिले माणुसकीचे दर्शन

28

✒️समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी)मो:-8552862697

माजलगाव(दि.26डिसेंबर):- परडी माटेगाव येथील प्रकाश सरवदे या तरुणाने रस्त्यावर सापडलेला बारा हजार किमतींचा मोबाईल परत करून माणुसकीचे तसेच ईमानदारीचे दर्शन दिले आहे. लऊळ येथील अक्षय शिंदे व संतोष कुरे हे सकाळी कामानिमित्त परडी माटेगाव वरून परत येत असताना लऊळ परडी रस्त्यावर अक्षय शिंदे यांचा मोबाईल पडला त्याच मार्गावरून शेतातून येडा मारून येणारे वृध्द आजोबा बाबासाहेब सरवदे हे घराकडे येत असताना रस्त्याच्या कडेला त्यांना बारा हजार रुपये किंमतीचा मोबाईल सापडला.

त्यांनी लगेच मोबाईल स्वतःकडे घेतला पण मोबाईल मधले फारसे कळतं नसल्याने त्यांनी थेट घरी प्रकाश सरवदे या त्यांच्या मुलाकडे मोबाईल सुपूर्द केला आणि ज्याचा मोबाईल आहे त्यांचा शोध घेऊन मोबाईल परत देण्यास सांगितले. आणि प्रकाशने एक दिवसात शोध घेऊन मोबाईलच्या शोधात असणारे शिंदे यांना परडी माटेगाव येथे बोलावून कसलीही अपेक्षा न करता त्यांचा मोबाईल परत केला.

या बदल्यात शिंदे तसेच कुरे यांनी प्रकाश सरवदे यास बक्षीस म्हणून काही पैसे देऊ केले, परंतु स्वाभिमानाने प्रकाशने ते घेण्यास नकार दिला त्यामुळे माणुसकीचे आणि इमानदारीचे दर्शन अशिक्षितांच्या घरी झाले आहे. यावेळी मोबाईल परत करतांना परडी माटेगाव येथील हॉटेल व्यावसाईक रंगनाथराव शेंद्रे , सरपंच ॲड.माधव शेंडगे, दत्ता चाळक, शिवभक्त संतोष कुरे, शिवकुमार स्वामी, सुधीर शेंद्रे, संतोष शेंद्रे, श्रेयस भोजने हे उपस्थित होते