विश्वास ट्रेडर्सचे दत्तात्रय पाटील राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने सन्मानित

30

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.27डिसेंबर):-विश्वास ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ए .जे .फौडेंशनच्या राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने महेश क्लब इचलकंरजी येथील महासन्मान सोहळ्यात गौरविणेत आले.दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीनां हा पुरस्कार देणेत येतो.

सिने अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अरूण नलावडे यांच्या हस्ते हरूण भाई ईनामदार, निसार सुतार, अॅड सचिन माने , धनाजीराव जगदाळे, पृथ्वीसिंग नाईक, सुरेश उमप, शाहीन शेख, कौशिक गायकवाड संस्थेच्या अध्यक्षा सौ अबोली मुल्ला, प्रा खरात यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार बहाल करणेत आला.त्यांना राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.