बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन तर्फे राजरत्न आंबेडकर यांना 10000/-रुपयांची देणगी

55

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

चंद्रपूर(दि.27डिसेंबर):-भारतातील बौद्ध अनुयायांची नाळ जगातील इतर बौद्ध राष्ट्राशी जोडण्याचे फार मोठे कार्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे करीत आहेत.

त्यांच्या या धम्म चळवळीला देणगी म्हणून बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन आफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या हस्ते हा निधी ब्यारिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन ,जयंत टॉकीज चौक,चंद्रपूर येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सदर निधी प्रदान करण्यात आला.

याच कार्यक्रमात चंद्रपूर येथील बौद्ध धम्माचे कार्य करीत असलेले एस.एन. बौद्ध उर्फ शंकरराव नगराळे यांनी एक लाख रुपये धम्म दान म्हणून राजरत्न आंबेडकर यांना प्रदान केलेत व शंकरराव नगराळे यांनी लिहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले दोन अरिय सत्य या पुस्तकाचे विमोचन देखील राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले व हे पुस्तक लेखकाने राजरत्न आंबेडकर यांना अर्पण करण्यात आले