एक लाखाच्या पाठोमाग आता अबकारी विभागाने जप्त केली 4 लाखाची दारू

29

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.27डिसेंबर):-अबकारी विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांचे आदेश व मागदर्शना खाली मोशी इकसाइज विभागा चे निरीक्षक के. जी. आखरे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री रवी राऊतकर तसेच जवान श्री बजरंग थोरात, प्रफुल्ल भोरे यांच्या पथकाने नव वर्षाच्या आगमनाची धाडसत्र मोहीम राबवून या पथकाने जामगाव ते बेनोडा रोड वर गस्तीवर असतांना एक चार चाकी वाहन मारुती ओमनी, क्र एमएच.31बीबी.4128 थांबवुन वाहनाची तपासणी केली असता 80 ली क्षमतेचे 10 ट्यूब गावरानी हातभटटी दारू मीळुन आली.

त्याची वाहनासह किंमत 3 लाख 67 हजार असुन आरोपी दिपक शामराव मोरे वय 46 वर्षे रा.जरुड ता.वरुड जि.अमरावती याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949नुसार अटक करण्यात आली त्यानंतर सदर पथकाने मध्य प्रदेश सीमेवरील सालबडी ते मोशी रोडवर पाळत ठेवून एक दुचाकी मोटार सायकल एमपी 48.एमएस. 8821 संशयित रित्या ऐताना दिसल्याने वाहनाची तपासणी केली असता त्या वर 80 ली क्षमतेच्या एक ट्यूब त्या मध्ये गावठी हातभटटी दारू असुन आरोपी ओझाराम नागोराव युवने वय 35 वर्षे रा घोरपेंड ता मुलताई जि बैतुल मध्य प्रदेश यांच्या ताब्यातुन वाहनासह 45 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असा एकुण दोन्ही कारवाई मध्ये 880 लीटर गावठी हातभटटी दारू सह 4 लाख 12हजार 200 रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मोशी एकसाइज विभागाचे अधीक्षक श्री राजेश कावळे यांचे आदेश व मागदशना खाली मोशी अबकारी विभागाचे निरीक्षक श्री के.जी.आखरे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री रवी राऊतकर तसेच जवान श्री बजरंग थोरात, श्री. प्रफुल्ल भोरे यांच्या पथकाने केली.