नाशिक येथील आस्था अनघादि फौंउडेशन च्या माध्यमातून “एक स्वेटर उबदार” हा उपक्रम

29

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

नाशिक(दि.27डिसेंबर):- पासुन जवळ असलेल्या त्रंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणगड हा पन्नास साठ किलोमीटर वर एक आदिवासी पाडा आहै. दिनांक26 /12/20 रोजी या ठिकाणी आस्था अनघादि फौंउडेशन च्या पदाधिकारी यांनी जाऊन आज पाड्यावरील गरजु बांधवांना तसेच लहान मुलांना थंडी पासुन बचाव करण्यासाठी ब्लँकेट ,शाल,स्वेटर तसेच कपडे वाटप केले.या सोबत मुलांना चॉकलेट व पुरी*भाजीचे जेवण पाकीट दिले.

समितीच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण यांच्या सोबत पाड्यावरील बाधवांशी चर्चा करताना काही बाबी पुढे आल्या येथिल बांधवांना आदिवासी शासकीय योजनांचा लाभ हवा आहै.त्या काही प्रमाणात मिळाल्या देखील आहै, परंतु अजुन काही प्रमाणात मिळाव्या अशी अपेक्षा बांधवानी व्यक्त केली.तरी मी प्रशासनाला विनंती करेल.की तोरणगड पाड्या वरील बांधवाना या शासकीय योजनांचा लाभ होणेस मदत करावी. तसेच येथील विद्यार्थी,तरूण वर्गानी ग्राउंड वर खळण्याचे खेळ साहित्य उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा बोलुन दाखवलि.जसे क्रिकेट, हॉली बॉल, इतर साहित्य.आम्ही, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपली मागणीशासना पर्यंत पोहिचऊन ती मान्य करण्याची विनंती करु. असे आश्वासन दिले.

या उपक्रमात सहभागी असलेले मा. माजी एस.पी.साहेब श्री.नितिन मिटकरी,यांनी मुलांना पोलीस व पोलीस अधिकारी कसे होता येईल याची माहिती दिली, तसेच उद्योजक श्री.मसुद बडोदावाला,यांनी उद्योग यावर माहिती दिली.वैशाली चव्हाण-सौंदाणे यांनी महिला यांचे शी संवाद साधला व,मंगला पिसे,यांनी मुलांना गुड टच, बॅड टच समजावून सांगितले, राखी ईशी, मुनिशा मर्चंट यांनी मुलांन सोबत हसतखेळत गप्पा केल्या ,अँड महेश शेवरे यांनी कायदेविषयक माहिती दिली. किशोर ईशी ,आदीथ्यवर्धन सौंदाणे,यांनी सर्वांन मध्ये आनंदाचे वातावरण तयार केले.