तहसिल कार्यालय धानोरा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.27डिसेंबर):-राष्ट्रीय ग्राहक दिन तहसिल कार्यालय धानोराच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक संवर्ग विकास अधिकारी यादव पदा होते तर अध्यक्ष म्हणून तहसिलदार सी.जी.पितुलवार, प्रमुख अतिथी तालुका कृषी अधिकारी एल.एस.पाठक, नायब तहसिलदार डी.आर.भगत, धनराज वाकुडकर, सौ.माधुरी हनुमंते, पं.स.चे खोब्रागडे, जुवारी तसेच चंदुभाऊ प्रधान, राज्यउपाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदु प्रधान यांनी केले तर प्रमुख अतिथी एल. एस.पाठक, उद्घाटक यादव पदा यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले.
 
 कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात ग्राहकांने जिवनोपयोगी वस्तु खरेदी करतांना जागृत राहावे. भ्रष्टाचार व लुबाळणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगीतले तसेच मतदार जागृती व मतदार  नोंदणीबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन केले. चंदुभाऊ प्रधान यांनी ग्राहक हक्क कायदयाचे सविस्तर विवेचन करुन धानोरा तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांनी शासनाने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे धान्याचे दर पाहुन धान्य खरेदी करावे. तहसिल कार्यालय धानोरा आय.एस.ओ.नामांकित करावयाचे आहे. नागरिकांचे कामे विहीत मर्यादेत झाली पाहीजे. व त्यांना त्यांचे हक्क दिले पाहीजे. आयएसओ अंतर्गत लोकसहभागातुन रंगरंगोटी, वृक्षलागवड, साफ सफाई करुन कार्यालयाचे स्वरुप पालटविले आहे.  त्यादृष्टीकोनातून तहसिल कार्यालयाची आय एस ओ कडे वाटचाल सुरु आहे. या करीता जास्तीत जास्त लोकसहभागाची गरज असल्याने त्यांनी प्रास्ताविक भाषणात सांगीतले.
 
 यावेळी तहसिलदाराच्या हस्ते राशन कार्डधारकांना रॉशन कार्डचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व्ही.सी.येरमे, यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.कविता नायडू यांनी केले. कार्यक्रमाला मनोज आकनुरवार,  कु.किरण मेश्राम, अर्चना दुधबावरे, महानंदा मडावी, पराग खोब्रागडे, रंजना कुशमवार, तुमरेटी, शिवणकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविण्याकरीता अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात तालुक्यातील ग्राहक व इतर विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.