खासदार अमोल कोल्हे व प्रोफेसर हरी नरके यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन

35

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.27डिसेंबर):- सकल ओबीसी समाज्याच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम प्राध्यापक हरी नरके सर , मा खासदार डॉ अमोल कोल्हे , राजे उमाजी नाईक स्मारक समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण यांच्या हस्ते खडक माळ मामलेदार कचेरी आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक या ठिकाणी संपन्न झाला.

कार्यक्रमात विचार मांडताना मा हरी नरके यांनी ओबीसी समाज जागृत व्हावा या साठी महामानवानी केलेल्या महान कार्याची माहिती कार्यक्रमात उदाहरण दाखल दिली व त्यांचे अर्ध राहिलेलं कार्य आपण पूर्णत्वास घेऊन जायला हवं त्याच बरोबर राजे उमाजी नाईक यांच्या कार्या बाबत देखील त्यानी प्रबोधन केले .मराठा आरक्षण बाबत बोलताना त्यानी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ओबीसी समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यानी आरक्षण घ्यावा आमचा त्या साठी विरोध नाही , खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कडे भिडे वाडा येथील स्त्रियांची पहिली शाळा फुले दाम्पत्याने सुरू केली त्या स्मारकाचा विषय गेली 14 वर्षे पूर्ण झाले नसून त्या करिता प्रयत्न करावे असे सुचवले.

डॉ अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त करताना सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे , सकल ओबीसी समाज्याच्या कार्याचे देखील त्यानी कौतुक केले व या अश्या कार्यक्रमा द्वारे समाज प्रबोधनाचे कार्य घडत असते असे त्यानी आपले मत व्यक्त केले व राजे उमाजी नाईक व महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमा निर्मिती करणार असल्याचे त्यानी आपले मत व्यक्त केले.

कांचन नाईक संस्थापिका अध्यक्ष सकल ओबीसी समाज यांनी 1जानेवारी 1847 रोजी भिडे वाडा येथे सावित्रीआई व जोतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आज 172 वर्ष झाले तरी तो वाडा उपेक्षित आहे तेथे स्मारक झाले पाहिजे या साठी प्राध्यापक हरी नरके व खासदार अमोल कोल्हे यांच्या कडे त्या बाबत पाठपुरावा करावाअशी मागणी केली .ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असे आपले मत व्यक्त केले.

अशोक गीते महासचीव सकल ओबीसी समाज यांनी दिनदर्शिका प्रकाशित करण्या मागचा संघटनेचा उद्देश स्पष्ट करत बोलताना सांगितले की घरोघरी वर्षभर सकल ओबीसी समाज्या द्वारे दिनदर्शिका माध्यमातून ओबीसी बहुजन जनते पर्यन्त कार्य पोहचावे व ही चळवळीची जोत अखंड पणे तेवत राहावी या करिता आपण दिनदर्शिका प्रकाशनाचे कार्य हाती घेतले व ते मागील दोन वर्षा पासून आपण सातत्याने हा उपक्रम राबवत आहोतआणि या पुढे ही सत्यता राहील असे आपले मत व्यक्त केले.

सोमनाथ काशीद , मृणाल ढोले पाटील यांनी देखील ओबीसी समाजा बाबत आपले मत व्यक्त केले.

राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक चे अध्यक्ष अप्पा साहेब चव्हाण यांनी रामोशी समाज्याची व्यथा व्यक्त केली समाज एकत्र आल्यास एक ताकद उभी राहू शकते असे मत त्यांनी व्यक्त केले.