गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक; चूल पेटवून खान्देशी जेवण वितरीत

37

🔺आंदोलनकर्त्या महिलांचा अनोखा निषेध

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

धुळे(दि.27डिसेंबर):- चुलमुक्त भारत निर्माण करण्याचा उद्देशाने केंद्र सरकारने उज्वला गॅस योजना आणली मात्र या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र सरकारकडून नागरिकांच्या पाठीवर सुरा खुपविण्याचा प्रकार करीत आहे तर आजच्या स्थितीत केंद्र सरकारच्या वतीने गॅस सिलेंडर चा दर एक हजार रुपयांच्या आत आहे.

तेव्हा सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना दरमहा गॅस सिलेंडरचा खर्च एक हजार रुपये महिना हा परवडण्यासारखा नसून नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडणारे असून गॅस सिलेंडर दरवाढ थांबविण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी १० वाजता राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले तर यावेळी आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून उपस्थितांना भाकरी आणि मिरची ठेचाचे जेवण देत अनोखा निषेध व्यक्त केला

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा’, ‘या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी संपूर्ण धुळे शहर दणाणून सोडले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या रणरागिणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची घोर निराशा केली असून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ केली आहे. हे सर्व त्रासदायक असून इंधन दरवाढीचा सर्वाधिक त्रास गृहिणींना होत आहे. त्यांचं किचनचं ‘बजेट’ कोलमडलं आहे. दिवसे न् दिवस वाढणारे हे भाव कमी करा. स्थिर करा अशी मागणी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी यावेळी केली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे व शहराध्यक्ष रणजित राजे भोसले उपस्थित होते..

याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोजताई कदम, मालती पाडवी, तरुणा पाटील, ज्योती मराठे, , संजीवनी पाटील, वैशाली खैरनार, माधुरी पाटील, रश्मी पवार,सरोज पवार, वर्षा सूर्यवंशी, उषा शिरसाठ आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्यात..

सौ. ज्योती पावरा
जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे

सौ. सरोजताई कदम
जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, धुळे.