चिमुरच्या इंदिरा नगर भागात घाणीचे साम्राज्य- नागरिकांचे आरोग्य धोक्यात

32

🔺नाली चोकप मुळे खराब पानी विहीरीत -नगर परिषदचड दुर्लक्ष

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.28डिसेंबर):- शहरातील इंदिरा नगर भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, तेथील नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण झाला असून नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे.चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या इंदिरा नगर नवीन प्रभाग क्रमांक 1 मध्ये घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत, तेथील कचरा कुंडया तुम्भ भरल्या असून कचरा रस्त्यावर पडलेला दिसत आहे.

त्या भागातील नाल्यांचे वाहनारे पाणी विहीरी मध्ये जमा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण झाला आहे, त्यांच् विहिरीतिल पानी नागरिक पिण्यासाठी वापरत असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता दिसत आहे. याबाबत इंदिरा नगर येथील नागरिकांनी वारंवार नगर परिषद ला तक्रार देऊन सुध्दा नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.