नेर येथे महामार्गावर मध्ये भागी खाड्यांमुळे ट्रक झाला खराब वाहतुकीची कोंडी

29

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

नेर(दि.28डिसेंबर):- नेर येथे रस्त्या वरच खड्यामुळे ट्रक चे पाटे तुटल्याने सुरात- नागपुर महामार्गावर मध्ये भागीच खराब झाला. वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्यांचे प्रमाण जास्त वाडले आहे.म्हणून वाहन चालक जीव धोक्यात घेऊन वाहन चालवत असता खड्याना पार करत अपघाताची बिती बाळगत असतात. महामार्ग वर सतत खड्यान मुळे जास्त ट्रॅफिक होत असल्याने वाहन चालक व ग्रामस्थ त्रस्त आहेत. वाहन चालकांना देवसेंदिवस अपघात होणार याची भिती वाटत असते.

रात्री चा वेळेस वाहन चालकांना जास्त अपघात होण्याची शक्यता खड्यांमुळे जाणवत असते व पांझरा नदी वरील पुलाचे पणं बरेच प्रमाणत कठडे तुटल्याने पुलाच्या मजल्या भागी बरेच प्रमाणात खड्यांचे प्रमाण बरेच वाडले आहेत. नेर फाट्यावर गावाकडे रस्त्या लागत खाड्यांचे जास्त प्रमाण असल्याने ग्रामस्थांना अडचणी येत असते. नेर गाव हे धुळे तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे गाव आहे. मजूर, शेतकरी वर्ग हे नेहमी शेतात जात असताना रस्ता ओलांडून जात असतात. व दरवेळेस ट्राफिक होत असल्याने बरेच अडचणी निर्माण होतात..

रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे या रस्त्याचे रूपांतर खड्ड्यांमध्ये झाले आहे यामुळे वाहनधारकांची प्रचंड कसरत होत असून रस्ता दुरुस्तीची मागणी होत. आहे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अवजड वाहन व इतर अवजड वाहनांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे खड्डे चुकवताना काही लहान-मोठे अपघात सुद्धा या मार्गावर झाले आहेत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी नेर ग्रामस्थांनी केली आहे.