बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -जगदीश गवळी

35

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.28डिसेंबर):-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या देशाला बौद्ध धम्म दिला आहे सारा भारत बौद्धमय करीन असे प्रतिज्ञा आपल्याला दिली आहे त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी उपासक उपासिका यांच्यावर आहे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवळी यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा सातारा तालुका व कराड तालुका यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदा प्रथमच ऑनलाईन 21 वि बौद्ध धम्म परिषद कराड येथे पार पडली यावेळी गवळी बोलत होते.भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 20 वर्षे धम्म परिषदेचे आयोजन होत आहे.

अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष व्ही. आर.थोरावडे साहेब,भन्ते दिपकरजी,बौद्धसभेच्या राष्ट्रीय जिल्हाअध्यक्ष साहेबराव लोखंडे,जिल्हा महासचिव विध्यादर गायकवाड,जिल्हा कोशाध्यक्ष श्रीमंत घोरपडे सर,अरविद आडसुले,भीमराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला उपासिका शिबिरे, व म्हाविहार कराड येथे श्रामणेर शिबिर आयोजित करणेत आले होते.

या सर्व शिबिराचा समारोप येथे करणेत आला.सहभागी सर्व शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करणेत आली.यावेळी जाखीन वाडी येथील बौद्ध लेण्यांचे संवर्धन करून तेथील अतिक्रमण काढावे आणि या ठिकाणी पर्यटन स्थळाचा विकास व्हावा.देशातील बौद्ध लेण्यांचे संरक्षण व संवर्धन करावे असा ठराव या परिषदेमध्ये करणेत आला.विध्यादर गायकवाड यांनी यावेळी सर्वाचे आभार मानले.