✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड-माण(दि.28डिसेंबर):-तालुक्यातील नागीबा देवाची यात्रा 29 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत होणारी नागोबा देवाची यात्रा रद्द करणेत आली असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून देणेत आली या कालावधीत नागोबा मंदिर बंद ठेवणेत येणार आहे.यात्रा कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर बांधव मिथ्या संख्येने आपल्या नागोबा देवाच्या दर्शनाला येत असतात.यात्रा कालावधीत मंदिर बंद राहणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शुक्रवार दि. 25 डिसेंबर रोजी होणारा मलवडी येथील श्री खंडोबाचा रथोत्सवपण रद्द करणेत आला असून रथोत्सव कालावधीत तीन दिवस ग्रामस्थानीच संपूर्ण लॉक डाऊन करुणेचा निर्णय घेतला आहे.श्री खंडोबाची यात्रा प्राचीन व गाजलेली असून यात्रेस रथोत्सवा दिवशी लाखो भाविक येत असतात सध्या प्रशासनाच्या निर्णयानुसार धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी आहे परंतु रथ मिरवणूक व पालखी सोहळे काढण्यास मात्र मनाई आहे त्यामुळे त्यादिवशी मानकरी व पुजारीच धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या देखरेखीखाली करतील.परंतु रथ मिरवणूक काढण्यास परवानगी राहणार नाही.
कोरोनाची प्रस्थ वाढू नये म्हणून ग्रामस्थानीच मलवडीचा बाजार भरवला नव्हता गर्दी टाळण्यासाठी ग्रामस्थानीच यंदाचा रथोत्सवात गर्दी हाऊ नये आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून तीन दिवस लॉक डाऊन करन्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान नागरिकांनी आणि भाविकांनी श्री खंडोबाच्या रथोत्सवास येण्याचे टाळावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करणेत आले.
धार्मिक , महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED