किशोरजी गुल्हाणे यांची छावा संघटनेच्या अमरावती जिल्ह्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड

29

✒️हर्षल बिजवे(विशेष प्रतिनिधी)मो:-9503683249

अमरावती(दि.29डिसेंबर):- जिल्ह्यातील वरूड चे युवा नेते तडफदार नेतृत्व असलेले प्रख्यात समाजसेवक किशोरजी गुल्हाणे हे कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून त्यांच्या कार्याची संपूर्ण वरूड तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चा असून ते प्रत्येकाच्या सुखा-दुखात ते समोर येत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपलेली आहेत.

याचे जिवंत उदाहरण म्हणजे एक महिन्याच्या आधी किशोरभाऊ गुल्हाणे यांनी वरूड शहरात पाहणी करून शहरातील गरजू गोर-गरीबांच्या घरी जाऊन त्याचे थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना ब्लँकेट चे वाटप करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. बरोबरच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधरजी काळकुटे यांनी किशोरजी गुल्हाणे यांची छावा संघटनेच्या अमरावती जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती केली.

व त्यांनी नेहमी असेच आपले सामाजिक कार्य करीत राहावे अशी इच्छा सुद्धा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. किशोर भाऊ गुल्हाणे यांना छावा संघटनेच्या अमरावती जिल्ह्याध्यक्ष पदी निवड करतांना त्यांना शुभेच्छा पण दिल्या गेल्या अशी माहिती आशिष देवघरे यांनी सांगितली आहेत. किशोरजी गुल्हाणे हे एक सामाजिक व्यक्तीमत्वच नव्हे तर ते दैनिक सूर्योदय या दैनिकाचे वरूड शहर प्रतिनिधी सुद्धा आहेत. त्यांच्या या अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील युवा वर्गातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे व सामाधानाचे चित्र दिसत आहेत.