या सत्रातील नागभीड तालुक्यातील पहिल्या नाट्यप्रयोगाचे कोदेपार येथे उद्घाटन

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

नागभीड(दि.30डिसेंबर):- कोरोनामुळे यावर्षी झाडीपट्टीत नाट्यप्रयोग होतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतांना अखेर काही अटी व शर्ती घालुन प्रशासनाने परवानगी दिल्याने नागभीड तालुक्यात नाट्यप्रयोगांना सुरुवात होत आहे. २९ डिसेंबरला कोदेपार येथील नवचैतन्य नाट्य कला मंडळाच्या वतीने आयोजित “ अंधारलेल्या वाटा “ या पहिल्या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सुधीर गिरडे हे होते . प्रमुख अतिथी पदी माजी सभापती व पं.स.सदस्या सौ. प्रणयाताई गड्डमवार , पं.स.सदस्या सौ.सुषमाताई खामदेवे , माजी प्राचार्य मुनघाटे सर , मिंडाळ्याचे माजी उपसरपंच विनोद हजारे , किटाडी मेंढा चे सरपंच हितेश कुमरे , सतिश मांदाडे , बाबुरावजी गजभे, सेवा सोसायटीचे बोरकर बाबुजी , कृउबास नागभीडच्या संचालिका श्रीमती शशीकला माटे , आपुलकीचे विजय बंडावार , पराग भानारकर , नितेश कुर्झेकर व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी जि.प.सदस्य संजय गजपुरे व सौ. किरण संजय गजपुरे यांचा वाढदिवसानिमित्य मंडळातर्फे शाल श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला . संचलन मंडळाचे संयोजक रुपेश माटे यांनी केले. मंडळातर्फे नाट्यरसिकांना सॅनिटायझर व मास्क चे वितरण करण्यात आले.