सावित्री उत्सव २०२१

29

✒️लेखिका:-सोनाली दातीर(बोर्न,जर्मनी)

सावित्री बाई यांच्या मुळे मी शिकले.उच्च शिक्षण घेवून मी जर्मनी मध्ये नोकरी करू शकले.त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मृती जागवायला हव्यात.त्या स्मृती जागविताना माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या जोतिबाचा माझ्या आयुष्यातील सहभाग इथे सांगणार आहे.

युरोप मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि आमचं work from Home सुरू झाले.या काळात युरोप मध्ये रुग्णाची संख्या वाढत होती.बाहेर कुठेच जाता येत नव्हते. भारतात कोरोना काळात अनेक लोक अनेक प्रकारे लोकांना मदत करीत होते.हे सोशल मीडियावर वाचत होते.अशा वेळी माझ्या मनात काही तरी वेगळं करावं असे सुचत होते. माझा नवरा तन्मय शी शेअर करीत होते.

अशात मला एक कल्पना सुचली की आपण भारतातील विद्यार्थ्यांना काही मदत करू शकतो का ?
आता जे इंजिनियरिंगला विद्यार्थी आहेत आणि जे परदेशात शिकण्याची संधी शोधत आहेत त्यांना जर्मनी बद्दल काही चांगली माहिती देता येईल का ? जर्मनी एक चांगले डेस्टिनेशन आहे तिथे चांगले इंजिनिअरिंगचे शिक्षण मिळू शकते आणि चांगले जॉब मार्केट ही आहे.याचा भारतातील विद्यार्थ्यांना फायदा करून देण्यासाठी हे जास्तीत जास्त विद्यार्थ्या पर्यंत कसे पोहचायचे याची चर्चा मी माझा नवरा तन्मय याच्याकडे केली होती.

मग तन्मय त्याचे ऑफिस सांभाळून माझ्या प्रोजेक्ट साथी मला मदत करू लागला.मुंबईत आपल्याला या कामासाठी कोण मदत करू शकेल याची त्याने शॉर्ट लिस्ट तयार केली.मग अनेकांना फोनाफोनी करून शेवटी त्याने मुंबईतील VJTI कॉलेज मधील एका प्राध्यापकांना संपर्क केला.मग मी त्यांच्याशी बोलले आणि या मुलांचा पहिला वेबेनार मी घेवू शकले.मला तर अशा कामाचा काहीच अनुभव नव्हता.मग सर्व माहिती गोळा करण्या पासून ते सर्व कंटेंट मुलांपर्यंत पोहचण्यासाठी त्याने मदत केली. आणि आम्ही त्या मुलांना जर्मनी बद्दल ,इथल्या विद्यापीठा बद्दल आणि जॉब संधी बद्दल चांगली माहिती आम्ही लॉक डाऊन काळात देवू शकलो याचा आनंद झाला.

अशा अनेक प्रसंगांत तन्मय माझ्या सोबत राहिला आहे. आमचे लग्न झाल्यावर आम्ही जर्मनी मध्ये आलो तेव्हा तो आणि मी वेगवेगळ्या स्टेट मध्ये रहात होतो.आम्ही शनिवार रविवार भेटत असू.त्याचे आई बाबा आणि सर्व नातेवाईक मुंबईत माझी आई, बाबा डोंबिवलीत,बहीण अमेरिकेत अशात लॉक डाऊन सुरू झाला या काळात तो माझ्याशी नवऱ्या पेक्षा मित्र म्हणून जास्त काळजी घेवू लागला.

फायनली आम्ही याच काळात एकत्र घर घेतले आणि आमचा संसार सुरू झाला.माझ्या करिअर मध्ये माझ्या रोजच्या आयुष्यात त्याची मदत होत आहे.अगदी लहान सहान गोष्टी मध्ये त्याची मदत होते.परदेशात रहात असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी साठी ही मदत झाली आहे.मी तर म्हणेन की प्रत्येक यशस्वी महिलेच्या पाठी एका पुरुषाचा हात असतो माझ्या पाठी माझ्या नवऱ्याचा तन्मयचा हात आहे.३ जानेवारीला मी घरात कंदील लावणार आहे आणि माझ्या खिडकीत एक मेणबत्ती लावणार आहे.सावित्री उत्सवाची आणि माझ्या जोतिबाची व्हिडिओ क्लिप मी माझ्या जर्मनी आणि युरोप मधील मित्र मैत्रिणी साठी इंग्रजी मध्ये करून पाठविणार आहे आणि सावित्रीचा जागर मांडणार आहे.