✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.30डिसेंबर):-स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि ऑनलाईन अर्थशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व उदघाटक म्हणून माजी प्रभारी कुलगुरू, प्रभारी कुलसचिव व वाणिज्य आणि व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डॉ. विनायक देशपांडे मार्गदर्शनात म्हणाले की, कोरोना काळात जसे मेडीकल, डॉक्टर महत्वाचे होते तसेच या काळात अर्थशास्त्र विषयाची भुमिका तितकीच महत्वाची आहे. अर्थशास्त्र हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्यातील सह्सबंध अगदी जवळचा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता गेट परीक्षा २०२१ मध्ये सुरु होत आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कार्तिक पाटील यांनी आधुनिक काळातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षेचे महत्व व व्याप्ती स्पष्ट केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी अर्थशास्त्र विषय किती महत्वाचा आहे हे समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर रहांगडले यांनी अर्थशास्त्र विषयाचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. राकेश कुमरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले, सचिव प्रा. कापसे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच बहुसंख्य विद्यार्थांनी उत्तम प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED