गंगाखेड नगरपरीषदेच्या कार्यलयिन अधिक्षकला लाच घेतना रंगे हात पकडले

25

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.30डिसेंबर):-गंगाखेड नगर परिषद येथे कार्यालय कर्मचाऱ्यावर या आधी तीन ते चार वेळा अशी लाच घेताना कार्यवाही झाल्या असून आज रोजी बुधवारी आणखी एक कार्यवाही गंगाखेड नगरपरीषदेचे कार्यलीन अधिक्षक यांना नगरपरीषद कार्यलयात दि.30 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता दिड हजाराची लाच स्विकार करताना परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगे हात पकडे आहे.यातील फीर्यादी मालमत्ता कर  रजिस्टरवर नाव नोंदणीसाठी सुरेश मणियार यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

पण ती तडजोड अंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले ठरल्याप्रमाणे दिनांक 30 डिसेंबर रोजी फिर्यादी यांनी पैसे घेऊन नगरपरिषद कार्यलयात दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरेश मणियार यांना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथक कल्पना बारवकर पोलीस अधीक्षक नांदेड ,अर्चना पाटील अप्पर पोलीस निरीक्षक नांदेड, भरत के. हुंबे पोलीस उपाधीक्षक परभणी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.