चंद्रपूर जिल्ह्यात (दि.30डिसेंबर) रोजी 24 तासात 41 कोरोनामुक्त 25 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह – एक कोरोना बधितांचा मृत्यू

    43

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    चंद्रपूर(दि.30डिसेंबर):-जिल्ह्यात मागील 24 तासात 41 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 25 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 271 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 447 झाली आहे. सध्या 460 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 72 हजार 730 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 47 हजार 377 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

    आज मृत झालेल्यामध्ये गडचिरोली शहरातील 21 दिवसाच्या बाळाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 364 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 334, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
    आज बाधीत आलेल्या 25 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील नऊ, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपुर एक, भद्रावती दोन, ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, मूल एक, चिमुर तीन, वरोरा एक, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णाचा समावेश आहे.

    कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.