महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने कोवीड-१९ योद्धांचा गौरव सोहळा संपन्न

41

🔹पिंपरी पुणे, महिला सेनेच्या शहर उपाध्यक्षा सौ अनिता बालाजी पांचाळ यांच्या पुढाकारातून कोवीड-१९ योद्धांचा सन्मान

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव प्रतिनिधी)मो:-९९६०७४८६८२

नायगाव(दि.30डिसेंबर):-कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत २४ तास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या योद्धांचा सन्मान व्हावा यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने कोवीड-१९ योद्धांना विषेश सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, पिंपरी चिंचवड शहर मनसे महिला सेनेच्या उपाध्यक्षा अनिता पांचाळ व बालाजी पांचाळ यांच्या वतीने पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात कोवीड-१९ योद्धा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी किशोर शिंदे, रणजित शिरोळे, मनसे गटनेते व नगरसेवक सचिन चिखले, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, लक्ष्मी सूर्यवंशी, हेमंत डांगे, राजू भालेराव, सुशांत दळवी, रुपेश पटेकर, बाळा दानवले, राजू साळवे, विशाल मानकरी,मिलिंद सोनवणे, दत्ता देवतरसे, निलेश नेटके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात निस्वार्थी सेवा बजाविणाऱ्या जिजामाता रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय सेवक व कर्मचाऱ्यांना ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी संयोजिका अनिता पांचाळ मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डाॅक्टर,परिचारिका, पोलीस कर्मचारी ,रेल्वे कर्मचारी ,मेडिकल चालक, पत्रकार, समाज सेवक, साहित्यिक, इतर बांधव भगिनीं सर्वच स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता समाजाची खऱ्या अर्थाने सेवा केली.

या कठीण काळात त्यांनी देवदूत बनून समाजाला या कोरोना राक्षसाचा जबड्यातून मुक्त करण्याचे काम केले. याबद्दल त्यांचे ऋण कधीही फिटणार नाहीत. परंतु या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजन सौ अनिता पांचाळ यांनी केले होते,