क्रांतीज्योती सावित्रीमाई

27

ज्योतीची वात होवुनी
तू ज्ञानदिवे पेटविले
वंदन तुज सावित्रीमाई
स्त्री संघर्षरथ ओढीले //1//

शेणामतीचे गोळे झेलूनी
साहिले असंख्य शिव्याशाप
ढळली न तुझी निष्ठा माई
उंचावलेस स्त्रियांची माप //2//

जोगदंड गुलामीची
स्त्री जागर करुनी मोडिले
फुलविण्या स्त्री जन्मा
अवघे आयुष्य जाहले //3//

साथीला ज्योतिबांच्या
वटवृक्षासारखी उभी
तुझ्या उदंड सामर्थ्याने
रेखिले इतिहास नभी //4//

अबलांची होऊनी आई
परिमार्जन झाली दुःखावरी
आद्यशिक्षिका भारताची
नाव कोरलेस जगावरी //5//

✒️राजेन्द्र धर्मदास बंसोड
आमगाव(गोंदिया)
8275290252