स्वाभिमानी पँथर दणका – महाराष्ट्र शासन आणि बेस्ट प्रशासन लागले कामाला

27

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.31डिसेंबर):- कोरोना योध्दा “बेस्ट कामगारांना” त्यांच्या हक्काचा आणि कष्टाचा “कोविड भत्ता” 31 डिसेंबर पूर्वी न दिल्यास बेस्ट प्रशासन मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असा लेखी इशारा “स्वाभिमानी भारतीय पँथर” चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अंकुशदादा कुराडे यांनी महाराष्ट्र शासन आणि बेस्ट प्रशासन यांना दिला होता

या इशाऱ्याची गंभीर दखल घेत बेस्ट प्रशासनाने दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढून, कोरोना महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या, स्वतःचा जीव धोक्यात टाकून कर्तव्यावर हजर बेस्ट कामगारांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत “कोविड भत्ता” देण्याचे मान्य केले आहे

बेस्ट प्रशासनाने मान्य केलेला कोविड भत्ता 15 जानेवारी 2021 पूर्वी कोरोना योद्धा बेस्ट कामगारांच्या खात्यात जमा न झाल्यास दिनांक 21 जानेवारी 2021 पासून बेस्ट प्रशासन मुख्य कार्यालयासमोर “आमरण उपोषण” करणार असा पुन्हा दणकायुक्त इशारा अंकुशदादा कुराडे यांनी दिला आहे.