वाढोणा रामणाथ येथिल कोडवते कुटूंबाचा घरकुलासाठी 2 वर्षापासून संघर्ष

30

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.1जानेवारी):-जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाढोणा रामणाथ येथिल एक वयस्कर पुरुष हे गेल्या पाच वर्षा पासुण एकाकी आणि अविरत संघर्ष आहे. त्यांचा मुलगा अपंग असुण अंथरुणाला पडलेला असतो पण वारंवार कार्यालयांचे उबंरठे झिजवुन आणि पात्रतेसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करुनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने आता सुधाकर देवरावजी कोडवते हे हतबल झाले आहे. घरकुल पासुण वंचीत असलेले लाभार्थी हे वाढोणा येथिल रहिवाशी असुन ते आदीवाशी आहे.

ते ग्राम.पचायत येथे जावुण सचिव यांना विचारपुस केली तेव्हा तुमचे यादी मध्ये नाव आहे आणि तुम्ही घरकुल ची फाईल तयार करुण तुम्ही पचायंत समिती मध्ये नेवुण टाका ,पधंरा दिवसात तुमचे घरकुल येईल असे सागण्यात आले.परतु 2 वर्षाचा कालावधी होऊण सुद्धा माझे घरकुल का आले नाही या विचारत असलेले सुधाकर यांनी आता विचाराचे हत्त्यारे वापरण्यास सुरुवात केली.असुण त्यांनी पं,समिती येथे तक्रार दाखल केली असून आता उपोषणाला बसल्या शिवाय पर्याय राहणार नाही असे सुधाकरने आपल्या अपंग मुलासह निर्णय घेतला आहे.

आपल्या कडे हक्काची जागा असतांना आपल्याला घरकुल पासुण वंचित का ठेवले जात आहे. या कडे काही राजकीय लोकांचा तरी हाथ नाही ना असा प्रश्नन जनमानसात चर्चा आहे .सध्यां हे कुटुंब आर्थिक विवंचनेत आहे. त्यांच्या कडे सध्या घराची साधी डागडुजी करता येनेही शक्य नाही.अशा परिस्थितीत क्षतीग्रस्त कुडामातीच्या घरात उघड्यावर राहण्याची वेळ या कुटुंबावर आला आहे. घरकुलला साठी पात्रतेचे सर्व निकष पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे याच परिवारातील व्यक्ती हे जि.प सदस्य आहे व ते काॅग्रेसच्या चिन्हावर निवडुण आले आहेत.