“चलो भीम की ओर” या सामाजिक वैचारिक आंदोलनाची दौंडवाडी येथून सुरूवात

33

🔸दौंडवाडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमीत्त मानवंदना

✒️राहुल कासारे(घाटनांदुर प्रतिनिधी)मो:-9763463407

घटनांदूर(दि.2जानेवारी):-१जानेवारी भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभास मौजे दौंडवाडी येथे मानवंदनेचा कार्यक्रम आज पार पडला . जगाच्या इतिहासात हाजोरेंच्या संख्येने लढाया झाल्या ,युध्दे झाली पण भीमा कोरेगांव चा इतिहासाला व युध्दाला तत्कालीन सामाजिक परिस्थिती प्रमुख पार्श्वभुमी होती.असं उदाहरण जागतिक पातळीवर कुठेही सापडनार नाही.विर मरन पावलेल्या शुरविर योध्दांच्या स्मृतीप्रीत्यार्थ क्रातीस्तंभ दस्तुरखुद ब्रीटीशांनी १८२२ रोजी भिमा कोरेगांव ला क्रांतीस्तंभ उभारला आहे त्यावर वीर योध्दांचे नावे सुवर्णआक्षऱात लिहिली आहेत .

“चलो भीम की ओर” या सामाजिक वैचारिक आंदोलनाची सुरुवात करूण समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष यांचा विचार आपल्या दैनंदीन जीवनात व आचरणात आणता यावा यासाठी हा वैचारिक क्रांतीचा लढा आपण सर्वांनी मिळून उभा करत येणार्या पिढीला सन्मानाने जगता यावे याकरिता त्याचाच भाग व सुरुवात म्हणून शौर्य दिनानिमीत्त शुर वीर यौद्ध्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम अंबाजोगाई तालुक्यातील दौंडवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु़ बाबासाहेब गोडबोले उद्घाटक एस.के .आयवळे ,धम्मदेसना :भंते गोवींद महानंदो ,प्रमुख उपस्थितीत आयु़ शाहाने साहेब ,राजकुमार टाळकुटे सर ,लिंबाजी दौंड,प्रा़ वैजनाथ सुरनर ,व मार्गदर्शक प्रा़ एम एम सुरनर,प्रा़ संतोष गडदे ,एकनाथ जावीर ,प्रमुख मान्यवर :अॅड गौतम आवचार, बालाजी टाळीकोटे ,प्रल्हाद भोईनर ,राजेंद्रय येळगे ,चंद्रकांत टाळीकोटे ,सुनील वाघमारे तसेच प्रा.राजेंद्र गोडबोले ,प्रीतम बळीराम गोडबोले कृष्णा पारसे, संदीप पारसे,महेंद्र तुकाराम गोडबोले केरबा तानबा गोडबोले, बळीराम पारसे व समस्त दौंडवाडी येथील डॉ बी .आर आंबेडकर रयत संस्था आनंदवन यांनी आथक परिश्रम घेवुन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.