बुलढाणा जिल्ह्यात 13 हजार 362 उमेदवारांकडून तब्बल 13 हजार 625 अर्ज दाखल

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.2जानेवारी):- जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे वारे जोमाने वाहत आहेत. निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी काल 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. निवडणूक आयोगाने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन अर्जही सादर करण्याची मुभा दिली होती. तसेच वेळही वाढवून देण्यात आली. त्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्जांचा धो.. धो पाऊसच पडला. जिल्ह्यात 13 हजार 362 उमेदवारांकडून तब्बल 13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी 23 डिसेंबर पासून अर्ज सादर करणे सुरू झाले.

तर 30 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारिख होती. जिल्ह्यात तालुकानिहाय निवडणूक ग्रामपंचायती, एकूण अर्ज व उमेदवार संख्या : बुलडाणा – ग्रामपंचायती 51, उमेदवार 1572 व अर्ज 1609, चिखली : ग्रामपंचायती 60, उमेदवार 1447 व अर्ज 1487, दे. राजा : ग्रामपंचायती 26, उमेदवार 597 व अर्ज 648, सिं. राजा : ग्रामपंचायती 43, उमेदवार 956 व अर्ज 992, मेहकर : ग्रामपंचायती 41, उमेदवार 1153 व अर्ज 1162, लोणार : ग्रामपंचायती 16, उमेदवार 424 व अर्ज 425, खामगांव : ग्रामपंचायती 71, उमेदवार 1804 व अर्ज 1843, शेगांव : ग्रामपंचायती 34, उमेदवार 800 व अर्ज 816, जळगांव जामोद : ग्रामपंचायती 25, उमेदवार 654 व अर्ज 661, संग्रामपूर : ग्रामपंचायती 27, उमेदवार 742 व अर्ज 742, मलकापूर : ग्रामपंचायती 33, उमेदवार 757 व अर्ज 757, नांदुरा : ग्रामपंचायती 48, उमेदवार 1184 व अर्ज 1188 आणि मोताळा : ग्रामपंचायती 52, उमेदवार 1272 व अर्ज 1295.

अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 13 हजार 362 उमेदवारांकडून 13 हजार 625 अर्ज दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी निवडणूक असणाऱ्या 16 ग्रामपंचायती लोणार तालुक्यात आहे. तसेच उमेदवार संख्याही 424 व अर्ज 425 आहे. सर्वात जास्त उमेदवार संख्या 1804 खामगांव तालुक्यात असून अर्ज 1843 आहेत.