मोहबोडी येथे सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन

30

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही(दि.2जानेवारी):-माळी समाज तथा क्रांतीज्योती युवा फाउंडेशन मोहबोडी द्वारा आयोजित 3 जानेवारी २०२१ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सकाळी ८.०० वाजता ग्रामस्वच्छता अभियान, सकाळी ९.०० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, त्यानंतर ९.०० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची गावातून शोभायात्रा काढून कार्यक्रम स्थळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जिल्हा परिषद प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेवार सर तर सोबत कू. आरती खंगार मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहबोडी, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री बळीराम मोहुर्ले, गिरमाजी लेनगुरे, गुलाब मेश्राम, मधुकर गुरनुले, दिलीप मोहुर्ले, देवानंद मोहुर्ले, विठ्ठल आवळे, राजेंद्र मोहुर्ले, विजय मोहुर्ले, ज्ञानेश्वर गुरनुले, योगराज आत्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमामध्ये क्रांतीज्योती युवा फाउंडेशन यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे गाव पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा समाज गौरव पुरस्काराने व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी २.०० वाजता महिला मेळाव्याचे आयोजन व चर्चासत्र आणि त्यासोबत मुला मुलींचे व महिलांच्या विविध स्पर्धा चे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता गाव सह भोजनानंतर रात्री आठ वाजता महिलांचे व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला COVID19 चे सर्व नियम हाताळून उपस्थित राहण्याचे आव्हान माळी समाज तथा क्रांतिज्योति युवा फाउंडेशन, मोहबोडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.