राष्ट्र सेवा दल,मुंबईचे सावित्रीच्या लेकी पुरस्कार जाहीर

32

🔹रविवार दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी गोरेगाव आणि मालाड येथे कार्यक्रम

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.2जानेवारी):-कोरोनाकाळात विशेष काम केलेल्या नायर रुग्णालयातील प्रिया बांदेकर यांना तर लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्ट या स्वयंसेवी संस्थेला. तसेच कोरोनाकाळात धान्य, जेवण, औषधे आणि रुग्ण शोधण्याच्या कामात मालवणी परिसरात काम करणाऱ्या वैशाली महाडिक आणि सफाई कामगार म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कल्पना राकेश रुडे यांना या यंदाचा “सावित्रीच्या लेकी पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.नायर रुग्णालयातील सर्व नर्सेस च्या वतीने प्रिया बांदेकर आणि लॉक डाऊन रिलीफ प्रोजेक्टच्या वतीने मितवा मुक्ता अनीश या पुरस्कार स्वीकारणार आहेत.
राष्ट्र सेवा दल,मुंबई च्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

यंदा मुंबई, गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे रविवारी ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजता शासनाच्या नियमाचे पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अभिनेते सुनील बर्वे आणि पत्रकार साहिल जोशी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार प्राप्त स्त्रियांशी गप्पा मारणार आहेत ज्ञानदा खोत.दुसरा कार्यक्रम राष्ट्र सेवा दल कार्यालय, मालवणी, मालाड येथे ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.या कार्यक्रमात वैशाली महाडिक आणि कल्पना रुडे यांच्याशी गप्पा मारतील सिरत सातपुते या कार्यक्रमाला कॉम्रेड ए.सी.श्रीधरन उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम फेसबुक लाईव्ह केले जाणार आहे.
….
आवाहन

३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा सावित्री उत्सव २०२१” म्हणून साजरा करावा. दारासमोर रांगोळी, दरवाज्याला तोरण, आकाश कंदील, उंबऱ्यावर ज्ञानाची पणती आणि घरात गोडधोड करून हा दिवस सणा सारखा साजरा करावा. सावित्रीच्या ओवी,सावित्री – जोतिबा यांचे साहित्य, शेतकरी बांधवांबाबत लिहिलेले शेतकऱ्यांचा आसूड यातील काही उतारे याचे वाचन करून सावित्री बाई यांची आठवण जागवावी, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.