सेवागिरी रथोत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा 

31

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.2जानेवारी):-संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गोवा ,राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत पुसेगाव  तालुका खटाव जिल्हा सातारा येथील     प.पू. श्री सेवागिरी महाराज यांचे वार्षिक रथोस्तव  12 जानेवारी 2021रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट घेण्यात आला .यावेळी ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव0मठाधिपती  सुंदरगिरी महाराज डॉक्टर सुरेश  जाधव , रणधीर जाधव ,सुरेश शेठ जाधव ,योगेश देशमुख, प्रताप जाधव, सपोनी विश्वजीत घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

 महाराष्ट्र मधील संपूर्ण दहा दिवस  मनोरंजनााठी व जातिवंत जनावरांची यात्रा म्हणून देशभर पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा नावलौकिक आहे परंतु यांना कोविड सारख्या जागतिक महामारइमुळे रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असून कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.