दोंडाईचा नगरपलीका व रोटरी सिनियर्स दोडांईचातर्फे मोफत कुत्रिम बुद्धिमत्ता फुफ्फुसांची तपासणी शिबिराचे उद्घाटन

32

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.3जानेवारी):-मा.आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून एच.डी.एफ.सी .बँकेच्या सि..एस.आर. फंडाच्या सहकार्याने दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद व रोटरी क्लब आँफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा शहरातील नागरीकांसाठी कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर अद्ययावत कुत्रिम बुद्धीमत्ता तपासणी (Artificial intelligence Test )द्वारे फुफ्फुस तपासणी शिबिराचे उद्घाटन उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते झाले याप्रसंगी नगराध्यक्ष ताईसौ नयनकुवँर रावल,माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील ,रोटरीचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, डॉ मुकुंद सोहनी , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ललीत चंद्रे इ.मान्यवर उपस्थित होते.

सरकारसाहेब रावल यांनी नुकत्याच पार पडलेल्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आपले संपुर्ण भाषण अहिराणीतुन केले त्यांनी बोलतांना सांगितले की कोविड संसर्ग कमी झाला आहे पुर्णतः गेलेला नाही म्हणुन रुग्णांनी काळजी घेणे जरुरी आहे . नगराध्यक्ष ताईसौ नयनकुवँर रावल यांनी नुतन वर्षानिमित्त सर्व शहरवासीयांना शुभेच्छा देऊन आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात असुन नागरीकांनी डिजीटल एक्सरे द्वारे तपासणी करुन लाभ घ्यावा.

प्रास्तावीकात प्रो.चेअरमन प्रविण महाजन यांनी सांगितले की
कुत्रिम बुद्धीमत्ता तपासणी (Artificial intelligence )शिबिरात १००० नागरीकांचे रक्त व डिजीटल एक्सरे तपासणी मोफत ( अंदाजीत ७०० रु किंमतीची) करुन पुणे येथील अद्ययावत प्रयोगशाळेत आँनलाईन रिपोर्ट पाठवुन त्वरीत नागरीकांना आपल्या फुफ्फुसांची बदलांची मुल्यांकन व कार्यक्षमता तपासणी होऊन कोरोना ,दमा इ.दुर्धर आजाराविषयी ताबडतोब ज्ञान होऊन रुग्णांना सतर्क होऊन पुढील उपचार त्वरीत करता येतील असे सांगितले.

रोटरीचे समाजहितासाठी विविध प्रोजेक्ट हाती घेतले असुन त्यांची माहिती राजेश मुणोत यांनी दिली त्यात कर्णबधीर मुलांसाठी संपुर्णपणे मोफत शस्त्रक्रिया ,महिलांसाठी छातीचे कर्करोगाचे वाढते प्रमाण बघुन इतर ५ क्लब सोबत संलग्न होऊन मँमोग्राफी व्हँनच विकत घेत असल्याचे सांगितले तसेच गरजुंना केंद्रीय सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे देण्यात येणारी आयुष्यमान भारत योजनेची माहिती पोहचवुन लाभ मिळवुन देण्याचे केंद्र रोटरी सिनियर्सद्वारा लवकरच सुरू करण्याचे सांगितले.कार्यक्रमास आरोग्य सभापती सौ मनिषा जितेंद्र गिरासे , नगरसेवक भरतरी ठाकुर ,शैलैश धनगर ,युसुफ कादीयानी ,रोटरीचे डॉ अनिल सोहनी , राजेंद्र परदेसी , डॉ राजेंद्र गुजराथी , डॉ सचिन पारख ,अँड नितीन अयाचीत , डॉ दिपक श्राँफ ,किशोर मालपुरकर ,संजय छाजेड , रविंद्र पाटील ,नामदेव थोरात ,हुसेन विरदेलवाला ,सौ अनुराधा सोहनी इ सदस्य उपस्थित होते.