नगर परिषद ब्रम्हपुरी द्वारा माझी वसुंधरा अभियानाचे अनुषंगाने जनजागृती करिता सायकल रॅली चे आयोजन आयोजित

    48

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.3जानेवारी):- शासनाच्या माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 च्या अनुषंगाने आपल्या शहराची राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी व्हावी त्यासोबतच शहरातील नागरिकांकडून वसुंधरेचे रक्षण करण्याकरिता जनजागृती करणे, शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने अधिक परिणामकारक पणे काम कसे करता येईल.

    शहरातील वसाहती मधून ओला व सुका असा विलगीकृत कचरा देणे,त्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे इत्यादी विषयाच्या अनुषंगाने काम करणे, शिक्षणाचे तसेच वारक-यांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहराला स्वच्छ व सुंदर तसेच पर्यवावरण पूरक करणे करीता आज दि.03/01/2021 रोजी सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.

    रॅलीकरिता नगराध्यकक्षा सौ.रिताताई उराडे,नगर सेवक मनोज वठ्ठे,न.प.मुख्याधिकारी श्री.मंगेश वासेकर, प्रशासन अधिकारी राहुल पिसाळ ,कर निरीक्षक राजेश चौधरी,स्वच्छ सर्वेक्षण नोडल अधिकारी श्री.प्रितेश काटेखाये, स्वच्छता निरीक्षक श्री.रमेश ठोंबरे, कु.सिटी को ऑर्डनेटर मोनिका वानखेडे व इतर सर्व नगर परिषद कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते