फार्मसी स्टूडेंट कौन्सिल बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी जिवन चेके यांची निवड

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.3जानेवारी):-देऊळगाव राजा येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी येथे दुतीय वर्षाला शिक्षण घेत असलेले जीवन चेके यांची फार्मसी स्टूडेंट कौन्सिल बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली.

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे फार्मसी स्टूडेंट कौन्सिल चे प्रदेश अध्यक्ष अक्षय राऊत यांचा मार्गदर्शनाने विदर्भ अध्यक्ष ईश्वर राऊत यांनी जिवन चेके यांची फार्मसी स्टूडेंट कौन्सिल चा बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली.

आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील फार्मसी चा विद्यार्थ्यांचा अडीअडचणी सोडविण्यासाठी आपली निवड करण्यात येत आहे असे जीवन चेके यांनी सांगितले.या निवडी मुळे देऊळगाव राजा तालुक्यातील विद्यार्थांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.