संत निरंकारी सेवा मंडळाकडुन शासकीय रुग्णालय बुलढाणा स्वच्छता अभियान

    40

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    बुलढाणा(दि.3जानेवारी):-संत निरंकारी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी बुलडाणा शहरातील शासकीय रुग्णालय बुलडाणा येथे स्वछता मोहिम राबविन्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा शेकडोच्यावर सभासदाच्या उपस्थितित स्वछता मोहिम राबविन्यात आली.

    यावेळी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड़ हे उपस्थित होते तसेच सोबत धर्मवीर आखाड़ाचे अध्यक्ष मृत्युंजय ऊर्फ कुणाल गायकवाड़ , शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना विधानसभा समन्वयक दीपक तुपकर, ज्ञानेश्वर खांडवे तसेच मंडळाचे अध्यक्ष हनुमान भोसले, संजय शहाणे, सुभाष राजपूत, सुरेखा चव्हाण यांनी सदर स्वछता मोहिम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केले.