गंगाबाई तलमले महाविद्यालयात ‘महिला शिक्षक दिन’ साजरा

34
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि. 3जानेवारी)-  स्त्रि शिक्षणाच्या आद्य प्रवर्तीका ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षक दिन म्हणून स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला महादेवजी कावळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. राकेश तलमले तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मंगेश देवढगले, प्रा. कुमोद राऊत, दुधराम काटेखाये, कनक ठोंबरे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शनपर भाषणात महादेव कावळे म्हणाले की, भारतीय स्त्रियांना चूल आणि मूल यांच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यास सावित्रीबाई ची शिक्षणाची ज्योत कारणीभूत ठरली अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. राकेश तलमले म्हणाले की, जीवनभर सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून कार्य केले या क्रांतीच्या ज्योती मुळेच क्रांतीचा सूर्य अधिक तळपला. आजच्या स्त्रीला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी सावित्रीबाई मुळेच प्राप्त झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कुमोद राऊत तर आभार प्रदर्शन कनक ठोंबरे यांनी केले.