मी भारत आहे

35

मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.
माझ्या मस्तकावर हिमालय विराजमान आहे.
माझ्या चरणस्पर्श हिंद महासागर आहे.
माझ्या पश्चिमेला अरबसागर आहे.
माझ्या पुर्वेला बुध्दाची सम्यक क्रांती आहे.
माझ्या मध्ये नद्याची उसळणारी गर्दी आहे.
गंगा ,गोदावरी,नर्मदा,ब्रम्हपुत्रा,नाग,प्राणहिता ,हुगळी,कावेरी ,वैनगंगा यांनी मी सुजलान सुफलाम आहे.
मी संविधानाची नवीन महाऊर्जा आहे.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

सारे धर्म,पंथ,भाषा,प्रदेश,माझ्यात
विलिन झाले आहे.
संविधानाने मला उन्नत केले आहे.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

माझ्यावर अनेक षडयंत्र केले पण अजून मी सशक्त आहे.
माझ्या गरीब,कामगार,शेतकरी,शिक्षक,सैनिक,डॉक्टर,इंजिनिअर,लेखक यांच्यावर माझा विश्वास आहे.
माझ्या संरक्षणाचे सच्चे शिल्लेदार आहे.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

विषमतेच्या मुळांना ते जाळणार आहेत.
माणसातील भेदांना ते गाडणार आहेत.
माणसाना एका धाग्यात रोवणार आहेत.
अंहकारवृत्तीला ते ठेचणार आहेत.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

तिरंगा राष्ट्रध्वज माझा प्राण आहे.
अशोक चक्र माझी गती आहे.
धम्म माणसाचा जीवनदाय आहे.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

उठा विरांनो,क्रांतीपाखरांनो
ज्ञानक्रांतीच्या भारतजनहो.
लोकशाहीच्या प्राणतत्वाचे
रक्षण करा रे विश्वजनहो.
मी भारत आहे.
जगातील लोकशाहीचा उद्दगाता आहे.

✒️लेखक:-संदीप गायकवाड
९६३७३५७४००