महिलांनी जगावर महिलाराज निर्माण करावे- रामचंद्र सालेकर, (राज्यउपाध्यक्ष डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र)

27

✒️वरोरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरोरा(दि.3जानेवारी):- जि.प.उच्च प्राथ.शाळा वाघनख पं.स. वरोरा येथे आज महिला शिक्षक दिन म्हणून सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून शासन निर्देशाप्रमाणे कोविड 19 चे सर्व निर्देश पाळून साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर म्हाणाले की, ३ जानेवारी १८३१ नायगांव येथे खंडोजी नेवसे पाटील व सत्यदेवीच्या पोटी एक क्रांतीज्योती देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या महिलांना उद्धारण्या प्रज्वलीत झाली. पती ज्योतिरावांना या समाजसुधारण्याच्या परम कार्यात सावित्रीने दिलेल्या साथीला जगात तोड नाही. कर्मठांच्या विरोधाला न जुमानता आपल्या कार्याचा हा महारथ ओढून नेला.

सर्व अस्पृष्य मानल्या गेलेल्यांना व सर्व स्रियांना भयान काळोखातून प्रकाशात आणनारे हे फुले दाम्पत्ये भारतातच नव्हे तर विश्वाच्या पटलावर विश्वरत्न म्हणून गौरवान्वीत करण्यास पात्र आहे. परंतु त्याचा हा गौरव भारतातच उपेक्षित आहे याचे कारण ज्या उपेक्षितांसाठी त्यांनी हे कार्य केले त्या उपेक्षितांना ज्यांनी उपेक्षित ठेवले त्यांच मनूची जळ असलेली जमात आजही या देशाची राज्यकर्ती असल्याने त्यांना हा सन्मान मिळू शकला नाही.

या देशातल्या तमाम स्त्रीयांची सावित्रीमाई फुले ही खरी उद्धारक आहे. धर्ममार्तडांचा सगळा रोष झेलून सहा मुलींना घेवून पहिली स्त्रीयांची शाळा या देशात सुरु करुन स्त्री शिक्षणाचा हा महारथ ओढून काढणारी ही क्रांतिज्योती, परंतु आज जिच्यामुळे महिला प्रगतीच्या एवढ्या उंच शिखरावर गेल्या त्यांच तिला विसरल्या असं खेदाने म्हणावं लागेल. याचे कारण आज सावित्रीमाईच्या पुण्याईने जेवढे शिक्षण घेवून आर्थिकदृष्ट्या स्त्रीया पुढे गेल्या तेवढ्याच वैज्ञानिकदृष्ट्या मागासल्याचे जाणवते.आजही अनेक रुढीपरंपरा अंधश्रद्धेच्या देव धर्म कर्मकांडात गुरफडून आपली शक्ती आत्मभान विसरल्या आहे. बुवा बाबा अम्मा च्या नांदी लागून शोषण अत्याचाराच्या शिकार होत आहे.

हे दृष्य बघून जणू सवित्रीची आर्तहाक कानटळात घुमत असल्याचा भास होते, जणू सावित्री सांगत आहे,..”मी तुम्हाला गुलामगीरीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी शेन दगड धोंडे अंगावर झेलले,रक्तबंबाळ झाले,स्वतः शिकून तुम्हाला शिकवायसाठी शाळा सुरू केली, वाटल तुमच्या डोक्यातल्या मानसिक गुलामीच्या बेड्या तुटून मुक्त व्हाल,परंतु आजचं चित्र बघितलं की वाटते तुम्ही शिकल्या मोठमोठ्या क्षेत्रात उंच भरारी घेतल्या कमावत्या झाल्या पद, पैसा, अधिकार, मान,सन्मान सर्व मिळाल परंतु तुम्हाला ज्या मानसिकतेने गुलाम केलं त्यातुनच मात्र तुम्ही मुक्त झाल्या नाही..

तुम्ही तर मी अंगावर झेललेल्या दगड धोंड्यांनाच शेंदूर लावून देव केलं ग! आणि पुजायला लागल्या,काय मी गुन्हा केला बरं?..वाटलं या पुरुषप्रधान मनुवादी व्यवस्थेन माझ्या महिलांना पायाखाली दाबून ठेवलं त्यातून मुक्ती मिळेल परंतु तुम्ही तरं कसाही असो तोच सातजन्मी मिळावं यासाठी माझ्याच दारातल्या वडाच्या झाडाला सुत गुंडाळायला येवून जणू मला माझ्याच घरी डिवचायला येता गं!,फार वेदना होतात गं! फार वेदना होतात!!.हे सर्व दृष्य बघून मला माझ्या पतीचे ते शब्द आठवते जेव्हा मी संततीसाठी ज्योतीबांना दुसरी पत्नी करण्याचा हट्ट धरला तेव्हा ते काय म्हणाले होते ठाऊक आहे?

त्यांनी मला म्हटले सावित्री, मुलाबाळासाठी मी दुसरी पत्नी करावी असे तुला वाटते त्यापेक्षा तूच दुसरा पती का करु नये?.किती!! माझा पती स्त्री स्वातंत्र्याचा हा महामेरु होता ग!.मला भिती वाटते ग!तुम्ही परत गुलाम व्हाल आणि आम्ही हे तुमच्यासाठी घेतलेलं कष्ट व्यर्थ तर जाणार नाही ना!…..शैक्षणिक दृष्या जरी महिलांनी प्रगती केली असली तरी आजही महिला या मनुवादी पुरुषप्रधान निसर्ग विध्वंसक यज्ञ संस्कृतिच्या देव धर्म कर्मकांडाच्या नावावर गुलाम झाल्या आहे. आर्यांच्या आक्रमणापुर्वीची साडेतीन हजार वर्षा अगोदरची आपली खरी मातृत्वाचा परम सन्मान करणारी प्राचीन मातृसत्ताक निसर्गपुजक सिधुबळी शिवसंस्कृती आपण पार विसरुन गेलो आहो.

परंतु वर्तमान युगात मराठा सेवा संघ या महान पुरोगामी चळवळीने आपल्या या हडप्पा मोहेंजदारो कालीन या आपल्या महान संस्कृतीचं पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण संशोधन करुन आपल्या या महान शिवसंस्कृतीचे शिवधर्माच्या रुपाने प्रकटन करुन जगातील एकमेव स्त्री सन्मानाचा धर्म स्त्रीलाच माॕ जिजाऊंच्या रुपाने आपलं प्रेरनास्थान माणून परत भारतातच नव्हे तर या विश्वात मातृसत्ता स्त्रीयांच राज्य परत निर्माण करण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवधर्माचं सुत्र दिलं आहे.

तेव्हा माॕ जिजाऊ सावित्रीचं अधुर राहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी तमाम स्त्रीयांनी आपल्या गुलामीच्या बेड्या तोडून विज्ञानवादी सत्य मंगल शिवधर्माचा मार्ग अंगीकारुन शिवधर्म विश्वधर्म व्हावा व महिलांनी ‘भारतावरच नव्हे तर जगावर मातृसत्ता निर्माण करुन महिलाराज आणावं असे माॕ.सावित्रीच्या जयंतीदिनी रामचंद्र सालेकर मुख्याध्यापक तथा राज्य उपाध्यक्ष शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्र यांनी आवाहन केले.

या प्रसंगी अध्यक्ष प्रकाश रामटेके उपाध्यक्षा सौ. रंजनाताई डफ तथा शाळेचे शिक्षक धनराज रेवतकर,संतोष धोटे,सौ.रेखा थुटे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन रेवतकर सर यांनी केले तर आभार सौ थुटे मॕडम यांनी माणून समस्त महिलांना महिला शिक्षण दिनाच्या अनंत शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.!!!