कुंडलवाडी शहरातील दुचाकीची चोरी आरोपीस सहा तासातच पोलिसांनी केले जेरबंद

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.3जानेवारी):-शहरातील जोड मारोती मंदिरावळील शेख अलीम शेख अब्दुल यांच्या घरासमोरून त्यांच्या मित्राची उभी करून ठेवलेली दुचाकी दि.१ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चालु करून चोरून नेली होती. कुंडलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यानंतर कुंडलवाडी पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित घटना घडल्या सहा तासातच आरोपीस दुचाकीसह जेरबंद केले.

दि.१ जानेवारी मध्यरात्री ते २ जानेवारी सकाळपर्यंत जोड मारोती मंदिर परिसरातुन घरासमोर ठेवलेली दुचाकी स्कुटी क्र.एम.एच.२६ एबी ७३१३ ही चोरीस गेली होती.पण दि.२ जानेवारी रोजी सकाळी घरासमोर दुचाकी आढळून आली नाही.त्यानंतर शहरात गाडीचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही.त्यानंतर फिर्यादी शेख अलीम शेख अब्दुल यांनी तक्रार दिली.या तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं.१/२०२१,कलम ३७९,भादंवि प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात कुंडलवाडी पोलीसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवुन घटना घडल्या सहा तासातच अर्जापुर परिसरातुन आरोपी संदिप अनिल कोंडेवार(रा.इस्लामपूर उमरी ) यास चोरीस गेलेल्या दुचाकीसह जेरबंद केले.अवघ्या काही तासातच पैलीसांनी तपास जलदगतीने करीत आरोपीस अटक केल्याने सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मांटे,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.