✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.4डिसेंबर):-तालुक्यातील जवळच असलेली मांडवा ग्रामपंचायत आज अविरोध करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका अविरोध व्हाव्या यासाठी आहवान केले होते . ग्रामपंचायत अविरोध होतील त्यांना प्रत्येक वर्षी वीस लाख रुपये अनुदान देण्यात येईल असे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केल्यामुळे पुसद तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत विरोध करण्याच्या धावपळीत होती.

पुसद तालुक्यातील निवडणूक २०२१ साठी १०५ ग्रामपंचायतीसाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत मधील गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेऊन मांडवा ग्रामपंचायत अविरोध करण्यात आली आहे.आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ज्या लोकांनी नामांकन भरले होते.

त्यापैकी देविदास मारोती गजभार ,गणेश पुंडलिक ढोले, रमेश चोखा ढोले, किरण प्रवीण आडे या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्यामुळे संगीता देविदास गजभार, कविता विठ्ठल आडे , गोपाल अरुण मंदाडे, जयश्री गजानन आबाळे, शालिनी हरिभाऊ धाड, विजय फुलसींग राठोड ,आरती बाळू पुलाते, अल्का रमेश ढोले या उमेदवार अविरोध झाले असून ग्रामपंचायत मांडवा घोषित करण्यात आली आहे .

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED