क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कवी कट्ट्याचे आयोजन

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.3जानेवारी):-स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ,ब्रह्मपुरी येथे अखिल भारतीय साहित्य मंडळ शाखा :- ब्रह्मपुरी च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्याच बरोबर या जयंती निमित्ताने कवी कट्ट्याचे आयोजन करण्यात आले होते .या दुहेरी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवी ,साहित्यिक श्री वसंत ताकधट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरी साहित्य मंडळ शाखेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ. मंजुषा साखरकर तसेच सचिव कवी भीमानंद मेश्राम हे होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंत ताकधट चंद्रपूर यांनी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण केले .यावेळी ब्रह्मपुरी येथील बहुसंख्य महिला कवयित्री सौ. ईंदू मुळे, सोनाली सहारे , ज्योती नवघडे, सरिता काळे ,शशि मदनकार, कवी अमरदीप लोखंडे , सुनील झाडे राजू भागवत व लोकमतचे पत्रकार मधू मेश्राम , चंदू सातव न्यूज-24, व बहुसंख्य कवी उपस्थित होते.

या कवीकट्टा कार्यक्रमात उपस्थित सर्व कवींनी आपापल्या शैलीत बहारदार कविता वाचन व गीतांच्या माध्यमातून रचना सादर केल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया जांभुळे तसेच भीमानंद मेश्राम यांनी केले.या कवी कट्टा कार्यक्रमाच्या प्रसंगी सौ मंजुषा साखरकर यांचा मनलहरी स्वलिखित चारोळी काव्यसंग्रह कवी .वसंत ताकधट, भिमानंद मेश्राम यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला.