आठवडी बाजारातून मोबाईल चोरणारा आरोपी गजाआड

26

🔺स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाची कार्यवाही

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.4जानेवारी):-२४ महागडे मोबाईल आरोपीकडून जप्त बुलडाणा जिल्हयातील विविध पोलीस ठाणे परिसरात भरणारे आठवडी बाजारातून दिवसागणीक मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती , मा . पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया यांनी याची दखल घेत सदरच्या घटनांना आळा घालणे व मोबाईल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणेकरिता पोलीस निरीक्षक श्री बळीराम गिते स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणा यांना आदेशीत केले होते.

त्यावरून पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणा यांनी विशेष पथक स्थापन केले होते . दिनांक ३१.१२.२०२० रोजी सायबर पोलीस ठाणे , बुलडाणाकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने पोलीस ठाणे जानेफळ जि बुलडाणा हददीतील राहणारे दोन इसमांना ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी दोन्ही चोरीचे मोबाईल हे आरोपी नामे निलेश जगन शिंदे रा . धानोरी , ता . चिखली जि बुलडाणा याचेकडून घेतल्याची कबुली दिल्यावरून तपास पथकाने निलेश जगन शिंदे यास ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला.

असता त्याने बुलडाणा जिल्हयातील विविध आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेत विविध कंपन्याचे २४ मोबाईल चोरल्याची कबुली दिली , त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने महागडे अड्राईड २४ मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण २ लाख ५४ हजार रूपये किंमतीचा मुदेमाल त्याचे ताब्यातून जप्त केले . सदर गुन्हयातील आरोपी व मुदेमाल पुढील कार्यवाहीकामी पोलीस ठाणे चिखली यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही श्री अरविंद चावरिया , पोलीस अधीक्षक , बुलडाणा , श्री हेमराजसिंह राजपूत , अपर पोलीस अधीक्षक , खामगांव , श्री बजरंग बनसोडे , अपर पोलीस अधीक्षक , बुलडाणा व श्री बळीराम गिते , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणा यांचे मार्गदर्शात सपोनि विजय मोरे , सपोनि नागेशकुमार चतरकर , पोउपनि निलेश शेळके , पोउपनि श्रीकांत जिंदमवार , पोउपनि प्रदीप आढाव , पोलीस अंमलदार संजय मिसाळ , गजानन आहेर , भारत जंगले , विजय सोनोणे , विजय वारूळे व सायबर पोलीस ठाणे येथील अंमलदार राजू आडवे , कैलास ठोंबरे यांनी पार पाडली .