माण तालुक्यातील 14 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

25

🔹माण मधील १४ ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड-माण(दि.5जानेवारी):-ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून एकच चर्चा होती की तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आणि कोणत्या ग्रामपंचायतची निवडणूक अटीतटीची होणार या गोष्टीला काही ठिकाणी खो बसला जात होता.

परंतु तालुक्यातील मोहि,मार्डी,इंजबाव,थदाळे,जाशी,तोंडले,टाकेवाडी,पुकळे वाडी,स्वरूप खानवाडी ,लोधवडे हवलंदारवाडी,कासारवाडी ,भाटकी,गंगोती या गावातील ग्रामस्थानी सर्वतोपरी प्रयत्न करून एकमुखाने आपल्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात मोलाचा वाटा उचलून निवडणूक ज्यांना निवडणूक व्हावी असे वाटत होते त्यांना चपराकच दिली.
वरील सर्वगावच्या ग्रामस्थांनी गावच्या विकासकामांसाठी एकजूट दाखवल्यामुळे त्याचे अभिनंदन होत आहे आणि यापुढे नेहमी ग्रामपंचायत बिनविरोधच झालातर गाव आपोआपच तंटामुक्त होईल अशी चर्चा आता तालुक्यात होत आहे.