कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने रायझिंग डे निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न

30

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.6जानेवारी):- येथील पोलीस ठाण्याच्या वतीने दि.५ जानेवारी रोजी शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पोलीस रायझिंग डे च्या निमित्ताने बैठक संपन्न झाली.या बैठकीत ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे,पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांनी ज्येष्ठांच्या समस्या, अडिअडचणी समजून मार्गदर्शन केले.

या बैठकीस नगरसेवक पंढरीसेठ दाचावार,पानसरे महाविद्यालय अर्जापुर चे उपाध्यक्ष राजेश्वरराव उत्तरवार,विश्वनाथ दाचावार, सेवानिवृत्त नायब तहसीलदार नरसिंग चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.