रक्षासभुवन रोडवरील दुर्दैवी घटना घडली असून दोषींना फाशी देणार का? मायबाप शेतकरी बळीराजाचे जीव घेणार – – माऊली नवले

46

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे):-मो:-9075913114, 9404223100

गेवराई(दि.6जानेवारी):-तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या तसेच त्यातून घडलेल्या अपघातांच्या तक्रारी गंभीर असून पोलीस व महसूल प्रशासन व वाळू माफियांविरूध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. पोलीस खात्यातील व महसूल अधिकारी यांचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार जर कुठेही उघडकीस आला तर त्याची आजिबात गय केली जाणार नाही. गंगावाडी यथील घटनेची पोलीस प्रशासन यांनी २४ तासाचे लेखी अश्वशन दिले होते.

आता २४ तास पण उलटून गेले परंतु कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून आलेली नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या यात सर्वच शासकीय यंत्रणा सहभागी असून पोलिस अधिकारी व महसूल विभाग हे सगळे स्वतः हायवे घेऊन रेतीचा उपसा जोरात करत असून यांनी सर्वांनी लाज कशी सोडली असा दावा तालुक्यातील शेतकरी वर्गातून बोलले जात आहे सावलेश्र्वर शिवारात रुस्तुम मते यांचे निधन झालं ही घटना दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अतिशय वाईट असून तालुक्यातील अश्या अनेक वेगवेगळ्या घटनेला राजकीय पक्ष, नेते सर्वच लोकप्रतिनिधी आणि सर्वच दलाल कार्यकर्ते जबाबदार आहेत.

यापुढे माझे मित्र व सर्व पदाधिकारी सर्व सहकारी शेतकरी बंधू भगिनींना सोबत घेऊन सापडेल तिथे अधिकारी व जबाबदार माणूस ठोकल्याशिवाय राहणार नाही तालुक्यात नेते विविध विभागाचे अधिकारी, काही नेते लहान मुलांच्या शाळेत चालणारा चोर पोलिस खेळ करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही असे मत गांगावडी व सामाजिक कार्यकर्ते माऊली नवले यांनी आमच्या प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले