खान्देश मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापुजन कार्यक्रम संपन्न

27

✒️ संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.6जानेवारी):- (श. प्र.) पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आज खानदेश मराठी पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शासकीय विश्रामगृहात खानदेश मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिमापूजन माल्यार्पण परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, बांधकाम सभापती निखिल जाधव, नगरसेवक नरेंद्र गिरासे, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन, यांच्या हस्ते केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक पंकज कुमावत म्हणाले की, लोकशाही मध्ये पत्रकारांचे खुप मोठे योगदान आहे. चुकीच्या कामांना वाचा फोडण्याचे पत्रकार करत असतात. पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार जे पी गिरासे, सदाशिव भलकार, सुनील धनगर, राजन मोरे, समाधान ठाकरे, अमृत पाटील, प्रदिप जाधव, जिवन रामोळे, हेमंत मराठे, अनिल सिसोदिया, नरेंद्र राजपूत नितीन भदाणे आदी उपस्थित होते…