पोलीस मित्र परिवार समनवंय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत “कोविडं योद्धा” पुरस्कार जाहीर

24
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.7डिसेंबर):-कोरोना महामारीने देशभर हाहाकार माजविला यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर केला यावेळी संपूर्ण देशातील जनता आपल्या घरात कैद झाली.कलम 144 लागू असल्याने अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागले.देशात आणिबाणीसदृश्य वातावरण तयार झाले कोरोना रुग्ण वाढू लागले काही लोकांचा यात बळीही गेला अशा तणावाच्या वातावरणात सुद्धा आपल्यावरील जबाबदारीचे भान ठेवत काही सामाजिक कार्यकर्ते,शासकीय अधिकारी,पत्रकार,डॉक्टर,
आरोग्य सेवक,सेविका,आदी लोकांनी आपले कर्त्यव्य प्रामाणिकपणे पार पाडले त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

कोरोनासारखा महाभयंकर रोग आटोक्यात आला. याचे सर्व श्रेय या लोकांना जाते. याकारणामुळे या कोरोना योध्याचा सन्मान होणे गरजेचे होते कारण त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्त्यव्य पार पाडले होते म्हणून पोलीस मित्र परिवार समनवय समिती महाराष्ट्र राज्य यांनी त्याचा सन्मान म्हणून “कोरोना योद्धा”पुरस्कारजाहीर केले त्यामध्ये माण तालुक्यातील श्री.सतीश भोसले,(ग्रामसेवक,ग्रामपंचायत बोथे), श्री.विकास निंबाळकर,(सामाजिक कार्यकर्ते),श्री.आकाश दडस (अध्यक्ष,माण पत्रकार संघ),यांना जाहीर झाला असून लवकरच या पुस्काराचे वितरण करणेत येणार असलेचे पोलीस मित्र परिवार समनवय समितीचे माण तालुका अध्यक्ष संतोष घाडगे यांनी सांगितले.