सावीत्री च्या लेकी शिक्षणाच्या प्रवाहा बरोबरच परिवर्तीत झाल्या पाहीजे – प्रज्ञा राजुरवाडे

30

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.7जानेवारी):-अंधारात चाचपळत पडलेल्या समाजाला प्रकाशात आनन्याचे काम सावीत्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातुन केल प्रस्तापित पुरुष व्यवस्थेला न जुमानता सावीत्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करून स्त्रीयांना बळ दिल सामर्थ्यवान बनवीले त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहे मात्र सावीत्री च्या लेकी वर्तमान स्थीतीत पाहीजे त्या प्रमानात सामाजीक व राजकीय क्षेत्रात परिपक्व दिसत नाही स्त्रीयांनी समाज विकास दृष्टीकोनातुन चळवळ उभी केली पाहीजे सावीत्री चा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन सावीत्री च्या लेकी शिक्षणाच्या प्रवाहा बरोबरच परिवर्तीत झाल्या पाहीजे असल्याचे मार्गदर्शन बार्टीच्या समतादुत प्रज्ञा राजुराडे यांनी केले.

काग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने सावीत्रीबाई फुले जंयती चे आयोजन करन्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष खापरी चे माजी सरपंच प्रकाश मेश्राम, प्रमुख अतिथी ललीता चौधरी, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता मेश्राम, कमल मेश्राम, मनोज रामटेके सुभाष रामटेके नानाजी मेश्राम आदी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा मेश्राम व आभार सानिया मेश्राम यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य महिला पुरुष उपस्थीत होते दरम्यान सांस्कृतीक कार्यक्रम घेन्यात आला.