माहेश्वरी सभा गंगाखेड तर्फे दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

30

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7जानेवारी):-दिनांक 6 जानेवारी दर्पण दिनाचे औचित्य साधत माहेश्वरी सभा गंगाखेड तर्फे शहरातील सर्व पत्रकार बांधवांच्या सत्काराचे आयोजन शहरातील समृद्धी फंक्शन हॉल येथे करण्यात आले होते. माहेश्वरी सभा वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवते त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी मारवाडी कालदर्शिकेचे प्रकाशन व दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी सभेचे भूतपूर्व अध्यक्ष गोपालदास तापडिया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार दगडू सोमानी, मंजुश्री दर्डा, प्रा. दीनानाथ फुलवाडकर, माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नंदकुमार सोमानी आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मारवाडी कालदर्शिकेचे विमोचन करण्यात आले व त्यानंतर मुख्य कार्यक्रमांतर्गत शहरातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे व न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी यांचा सन्मानचिन्ह, पत्रकारांची लेखणी(पेन) व गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अन्वर लिंबेकर, अनिल शेटे ,गोपाळ मंत्री,उत्तम आवंके, अंकुश वाघमारे, संजय सुपेकर, गोविंद रोडे, रमेश कातकडे ,अरुण मुंडे, तुकाराम आय्या, गोविंद चोरघडे, बाळासाहेब राखे, सुनील कोनार्डे, महालिंग भिसे, गोविंद लटपटे, शंकर इंगळे, अनिल साळवे, गुणवंत कांबळे ,भीमराव कांबळे, सय्यद गौस, पिराजी कांबळे, देवानंद गुंडाळे, मोहसीन खान तडवी, बाळासाहेब स्वामी, राजपाल दुर्गे, राजकुमार मुंडे, तुषार उपाध्याय, सुहास , शिवाजी कांबळे, अंकुश कांबळे, लक्ष्मण वानखेडे, आनंद शिंदे प्रमोद साळवे, बाळासाहेब कदम, भागवत जलाले, उद्धव चाटे आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तर या सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब राखे व संजय सुपेकर यांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या कार्याची दखल घेत सत्कार केल्याबद्दल माहेश्वरी सभेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नंदकुमार सोमानी, सचिव विजयकुमार बंग ,जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, तालुका उपाध्यक्ष प्रशांत काबरा, कोषाध्यक्ष गोविंद भंडारी, संघटन मंत्री मनीष तापडिया, जिल्हा प्रतिनिधी डॉ मनिष बियाणी, गोपाल ओझा ,रामचंद्र राठी, ऍड. पंकज भंडारी, राजू मणियार पवन दायमा, आनंद धोका यांच्यासह महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रेमलता नावंदर,मीरा तापड़िया,योगिता भंडारी,सुनीता राठी,संगीता भंडारी तसेच युवा संघटन चे आनंद सारडा ,गोपाल तापडिया ,शुभमचायल ,अभिषेक डाड ,तुषार उपाध्याय आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन विजय कुमार बंग तर आभार प्रदर्शन गोपाल मंत्री यांनी केले.