आली मतदानाची वारी

  51

  आली मतदानाची वारी
  सुरू जय्यत तयारी
  फिरतो मजेत पुढारी
  पण मतदार विचारी….

  जाई उमेदवार दारी
  उधळी नोटाच्या सरी
  म्हणतो गाव बरा करी
  सगळ्यात मीच भारी…

  आस्वासने-वचने
  घेऊन शिकारी
  दिसती लोकांना
  सदा नेत्यांची लाचारी
  चरित्र नाही अंगारी
  म्हणे मलाच मत मारी
  पण निवडुन देणे
  आहे मतदारांची मजबुरी…

  सारेच उमेदवार
  असती आशेवरी
  मतदार राजा
  कुणाला मत मारी
  काही फिरती माघारी
  काहींना मतदान तारी
  किमया ही सारी
  आहे मतदारांची न्यारी…

  ✒️कवी:-मंगेश रेखा हरीचंद्र मस्के(मो:-9623466331)