मैदानी खेळाद्वारे मन आणि शरीर मजबूत होण्यास चालना मिळते. युवा प्रवर्गानी या स्पर्धेत नक्कीच उतरावे मा.आमदार राहुलभाऊ बोंन्दे

26

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

चिखली(दि.7जानेवारी):- तालुक्यामधील मौजे उंद्री येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सदर क्रिकेट स्पर्धाचे उद्गघाटन मा राहुलभाऊ बोंन्दे यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले

सोशल मीडियावर आजकाल व्हार्चुअली खेळ मोबाईल द्वारे म्हणा की संगणकाद्वारे भरपूर प्रमाणात खेळल्या जातात. त्यामुळे येणारी भावी पिढी हे मैदानी खेळ खेळतच नाही पण मैदानी खेळाची चवच न्यारी म्हणावी लागेल.

मैदानी खेळाद्वारे मन आणि शरीर मजबूत होण्यास चालना मिळते. युवा प्रवर्गानी या स्पर्धेत नक्कीच उतरावे असे आवाहन मा. राहुलभाऊ बोंन्दे यांनी केले.आणी उद्घाटन करतांना आज माजी आमदारसाहेबाना पण क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.यावेळी त्यांनी  आयोजकांचे मनस्वी आभार मानले तथा स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व क्रिकेट टिम्स ना खूप खूप शुभेच्छा दिल्या

या वेळी उपस्थित सर्व पदाधिकारी तथा सहकारी युवक प्रवर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.