बुलढाणा जिल्ह्यात (दि.7जानेवारी) रोजी 342 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ –  तर 41कोरोना पॉझिटिव्ह

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.7जानेवारी):-प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 383 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 342 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 41 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 39 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 258 तर रॅपिड टेस्टमधील 84 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 342 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 9, बुलडाणा तालुका : भादोला 1, मोताळा तालुका : बोराखेडी 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : चंदनपूर 1, चांधई 1, उंद्री 1, खामगांव तालुका : पारखेड 1, पिं. राजा 4, गोंधनपूर 1, खामगांव शहर : 8, मेहकर शहर : 1, दे. राजा शहर : 8, दे. राजा तालुका : बोराखेडी 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 41 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सजनपूरी, खामगांव येथील 85 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज 58 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : मोताळा : 8, दे. राजा : 12, खामगांव : 13, शेगांव : 4, जळगांव जामोद : 2, चिखली : 5, संग्रामपूर : 1, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 2, अपंग विद्यालय 2, मेहकर : 2, मलकापूर : 2, नांदुरा : 3,तसेच आजपर्यंत 92625 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12347 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12347 आहे.

तसेच 840 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 92625 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12843 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12347 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 340 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 156 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED