दर्पण दिनानिमित्त कुंडलवाडीत पत्रकारांचा सत्कार

28

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.7जानेवारी):-तालुक्यातील कुंडलवाडी य़ेथे
पत्रकार दिनानिमित्त कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ६ जानेवारी रोजी शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगिरे व पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांनी उपस्थित पत्रकारांना लेखणी देऊन त्यांचा गौरव व सत्कार केला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन.जी.वाघमोडे, कल्याण गायकवाड, अशोक हाके,महमद अफजल,सय्यद इस्ताकअली,राजु लाभशेटवार, नागोराव लोलापोड, संतोष मेहरकर,अमरनाथ कांबळे, माधव हळदेकर,शमशोदीन शेख,लिंगुराम पय्यावार,सिध्दार्थ कांबळे,बारीखान पठाण आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच शहरात आँल इंडिया तन्जिम-ऐ-इन्साफ चे शहराध्यक्ष माजीद नांदेडकर यांच्यातर्फे ही शहरातील पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.