ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

26

🔹पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.7जानेवारी):-महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्धापन दिनानिमीत्याने राज्यभरात आठवडाभर पोलिस विभागाच्या वतीने विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याच अनुषंगाने ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनच्या वतीने ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आला.

राज्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. अनेक रूग्णांना रक्ताची गरज भासत होती. ह्याची गांभीर्यता लक्षात घेता सदर रक्तदान शिबिर राबविण्यात आले.यावेळी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनमधील अमोल गिरडकर, अजय कटाईत, राजु उपासे, मुकेश गजबे, अनुप कवठेकर,योगेश इंगोले, संदिप गावंडे, सैनिक योगेश मैंद या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

यावेळी पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनील कुमरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुभाष खिल्लारे, डॉ. अब्दूल रब शेख, योगीराज देशमुख, नितीन भगत, तंत्रज्ञ एच.के. मैंद, शितल मडावी, उज्वला नंदेश्वर, अश्लेषा सिस्टर हे यावेळी उपस्थित होते